सैराट!

सैराट!

पहिल्यांदाच माझ्या हातून प्रेमकविता घडली आहे. जमली का नाही ते तुम्हीच ठरवा. सैराट पाहून जे सुचलं ते मांडण्याचा प्रयत्न..

एक गोष्ट लिहावी म्हणतो
आटपाट नगरात वसलेली
फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम पासून
लांब कूठेतरी दडलेली

त्यात असेन मी
एक नायक हरवलेला
आणि माझी ती
स्वतःला माझ्यात हरवू पाहणारी

नसेल डोक्यावर छत अन्
नसेल हातात चांदीचा चमचा
असेल संसार तरी
तीचा, माझा, फक्त आमचा..

मला रोमियो, रांझा म्हणू नका
अन् नका म्हणू तीला ज्युलीएट किंवा हीर
ते मेले, पण आम्ही जगू
नाही कोणाची फिकीर

नका अडकवू आम्हाला
नकोय तूमची जात अन् धर्म
आमची जात प्रियकराची
प्रेमच धर्म अन् तेच कर्म

तुम्ही म्हणाल मला वेडा
म्हणाल कलीयुगात असं प्रेम मिळतं कुठे?
पण मला माहित आहे
ती वेडी पण माझीच वाट बघते आहे
खुळ्यागत मलाच शोधत फिरते आहे

मिळेल आम्हाला आमची वाट
शोधू आम्ही एकमेकांना
आणि इतके हरवून जाऊ एकमेकांत
की नाही सापडणार, स्वतः स्वतःलाही;
होवून जाऊ सैराट!

अशा प्रेमाची वाट पाहतोय
शोधतोय अशी प्रेमिका
मुखवट्यांच्या ह्या जगात
हे प्रेम कोणी शोधून देईल का?

त्यात नको कोणते कायदे
नको कसला करार
आम्ही प्रेमाचे कैदी होऊ
होऊ प्रेमनगरीत फरार

आम्ही प्रेमाचे कैदी होऊ
होऊ प्रेमनगरीत फरार…

– अभिजीत जोग

6 thoughts on “सैराट!

  1. तुझा लिखाण प्रवास असाच चालू राहू दे. Keep it up. Wishing you all the best.

    Liked by 1 person

Leave a comment