सावधान! घरात उंदीर आलाय!!

सावधान! घरात उंदीर आलाय!!

त्यादिवशी रात्री उशीरा Match होती. ती बघून मी झोपायला गेलो. माझ्या खोलीचं दार उघडून आत शिरलो आणि बघतो तर काय? एक छोटा उंदीर भींतीलगत चालत माझ्या गिटार मागे जाऊन लपला! माझी झोप एका क्षणात नाहीशी झाली. घरात उंदीर आहे आणि तो अंधारात इतक्या सहजपणे मुक्त संचार करतोय ही गोष्ट धक्कादायकच होती!! ती गोष्ट पचवतोय तोच दारामागून दुसरा उंदीर (पहिल्यापेक्षा जरा मोठा) टुणकन उडी मारून आला आणि माझ्या गादीजवळून पळत खिडकीतून बाहेर गेला! हे म्हणजे जरा अतीच होतं! घरात एक सोडून दोन उंदीर!! मी तडक आई-बाबांना उठवलं. झाडू घेऊन हळुच माझ्या गिटार जवळ नेला तर ते पिल्लू घाबरलं आणि त्याच्या जेष्ठ बंधू/भगिनी प्रमाणे खिडकीतून बाहेर निसटलं. मी लगेच खिडकी बंद केली आणि सुटकेचा निःश्वास टाकला! “हि खिडकी आता रात्री बंदच ठेवत जाऊ” असा सर्वानुमते निर्णय झाला आणि आमची गृह समितीची बैठक बरखास्त झाली. त्यानंतर गेल्या काही दिवसात पून्हा काही उंदीर दिसला नाही. तरी रोज रात्री झोपताना मी आपलं गिटार सरकवून पाहू लागलो.
Cut to – आज पहाटे ५ वाजता.
बाबांनी मला क्लासला जायला म्हणून उठवलं. मी उठून बाहेर आलो तर बाबा म्हणले, “उंदीर ना साला घरात शिरलाय बहुतेक.” मी म्हणलं, “का काय झालं?” “अरे आत्ता दिसला passage मध्ये. माझी चाहुल लागताच आमच्या खोलीत पळाला!!” त्यांचा स्वर काहीसा चिंतीत वाटला. “चायला म्हणजे आता काय ती खिडकी कधी उघडायचीच नाही का काय?” मी रागात म्हणलं. “चल तू आवर, ह्याच नंतर बघू!” माझ्या रागाकडे दुर्लक्ष करत म्हणले. त्यानंतर चहा पीत असताना उगीचच माझी नजर passage कडे जात होती. कुठे उंदीर दिसतोय का! कुठे हालचाल दिसते का! ह्यकडेच लक्ष! क्लासला जाताना सुध्दा माझ्या डोक्यात चिंता. पण आपलं मन किती अफलातून आहे ह्याची अजून एक अनुभूती मला आज झाली.
म्हणजे घरात उंदीर आहे ह्या fact पेक्षा तो खरच असेल तर काय? ह्याची चिंता जास्त. वास्तविक एवढसं ते पिल्लू. म्हणलं तर त्याला कसही हुसकावता येईल. कारण इतकी वर्ष तळ मजल्यावर (तोही एका चाळीचा) राहिल्यामुळे ‘उंदीर-घुस आणि त्यांना मारा-हुसकवायचे उपाय’ यावर आमची PhD झालीये म्हणा ना! उंदीर पळवणे आणि त्याच्या भीतीने माझ्या बहिणीला पळवणे हा विरंगुळा होता माझा. आमचे भाऊ, बाबा आणि मी झाडू घेऊन शिकार करायचो. आणि हाती लागलेलं सावज घराबाहेर टाकायची कामगिरी माझी! त्यामुळे त्याची शेपुट धरुन मी ते उचलायचो आणि ताईला पण घराबाहेर पळवायचो!! 😛
तर मुद्दा हा की खरतर एवढी चिंता करायचं कारण नव्हतं. पण तरी मला उगाच असं वाटत होतं की तो उंदीर माझा मोबाईलचा चार्जर कुरतडेल, किंवा laptopच कुरतडेल, किंवा माझे कपडे अगर पुस्तकच खाईल. म्हणजे तो उंदीर कदाचित आल्या पावली परतला असेल, पण ह्या शंका मनात घर करुन राहिल्या. हिंदीत ‘शंका’ याला ‘शक’ असा शब्द आहे. त्यामुळे उंदराला ‘मुषक’ का म्हणत असावेत याचा वेगळा पैलू मला सापडला. ह्या सगळ्या विचारांत मग्न असतानाच मन किती अफलातून असतं हे मला कळलं. त्या उंदराची मी (माझं मन) देशात सध्या trend मध्ये असलेल्या Intoleranceशी तुलना करु लागलो. म्हणजे पहा ना, कोण कुठूनही ऐरा-गैरा उठतो आणि ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला’ ह्या म्हणीचा पुरेपूर वापर करत Intolerance ची भाषा करतो. सोशल मिडियाने ह्या शब्दाचा इतका भुगा पाडला की विचारु नका. त्या मिडीयाला खरच सोसावं लागत. त्यामुळे सोशल मिडीयाचे सोशिक प्रेक्षक झालेले आहोत.
खरच असंतोष आहे, की आमच्या घरातल्या उंदरासारखी त्याचीही नुसतीच हवा आहे ह्याकडे कोणी लक्षच देत नाही. आणि जरी असेल तरी त्यावर बोलणारी तोंडं हजार (मला धरुन) पण त्याविरुध्द करणारे हात कुठेत? म्हणजे घरातला उंदीर ‘उंदीर हुसकवायचे रामबाण उपाय’ यावर परीसंवाद घेऊन तर बाहेर जाणार नाहीये ना? त्यासाठी हातात झाडू (आपचा नाही) घ्यावाच लागेल ना?
पण मग Intolerance ह्या विषयाला नक्की कुठला झाडू पाहिजे? तर तो वैचारीक हवा. चांगले विचार मनात असतील तर असंतोष राहणारच नाही. म्हणजे सर्वधर्म समभाव, हे आपण नूसतं एैकतो. पण किती लोक ते आचरणात आणतात? आणि अहिंसा पूस्तकापुरतीच? “मी कुठे कोणाला मारायला जातो?” अस जर तुम्ही म्हणलात तर एकदा विचार करा, कधीतरी मनातल्या मनात एखाद्याला एक खाणकन लगावली असेलच, किंवा आपल्याला धक्का देऊन गेलेली व्यक्ती कुठेतरी पडावी असा विचार आला असेल. हि मानसिक हिंसाच नाही का?
तर या सगळ्याचा विचार करता तुम्हालाही हे जाणवेल की हे Intolerance प्रकरण केवळ राष्ट्राच्या प्रगतीत अडथळा म्हणून उभं केलेलं सोंग आहे. आज आम्हाला मोदी, पर्रिकर, प्रभू, गोयल, इराणी, फडणवीस आणि अनेक इतर मंडळी काय करामती करतात हे so called alternate media कडून कळतं. किंवा त्यांच्या Facebook पेज वरुन कळतं. मग जे आम्ही टिव्हीवर बघतो त्याला Mainstream मिडीया कसं म्हणायचं? ह्यावर विचार केलाच पाहिजे. नाहीतर कन्हैया कुमार सारखे गल्लीतले गुंड देश चालवायला लागतील आणि आपल्या सारख्यांना ‘हरी हरी’ करत बसावं लागेल.
ह्या उंदरांना वेळीच झाडू (पुन्हा आपचा नव्हे) दाखवला पाहिजे.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद! जय महाराष्ट्र! भारत माता की जय! (नाही बोललो तर रामदेव शीरच्छेद करणारे म्हणे? कठिण आहे. किती तो Intolerance!? :p

– अभिजीत जोग

image